भंडाऱ्यात आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

भंडाऱ्यातील जवाहरनगरमध्ये आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. कारखान्याच्या आर.के. ब्रांच सेक्शनमध्ये स्फोट झाला. स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.