नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन तीन दिवस लोटत नाही तोच भंडारा जिल्ह्यातील एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्हा परिषदेतील शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे ही घटना घडली असून यशस्वी सोपान राऊत (वय – 6, रा. पुयार) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 10 वाजता यशस्वी राऊत ही विद्यार्थिनी शाळेत आली होती. त्यानंतर लघुशंकेसाठी गेली असता जवळच लावण्यात आलेल्या आरओच्या जिवंत तारेता तिला करंट लागला आणि ती बेशुद्ध पडली. याची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने तिला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी आणले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, लाखांदूप पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाळी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.