भंडारा – वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, चार जण जखमी

भंडारा जिल्ह्यात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मोहाडी तालुक्यातील आंदळगाव येथे परे रोवणीचे काम सुरू होते. दुपारच्या सुमारास मजूर शेतात रोवणी करत होते. अचानक आकाशात विजेचा कडकडाट झाला व मजूर महिलांच्या अंगावर वीज कोसळली यात कलाबाई गोखले, व आशा सोनकुसरे या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले. जखमींना मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.