भंडारा: टँकरने पाणी पुरवठा करून धानाची नर्सरी वाचविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न; पावसाने मारली दांडी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

bhandara-tanker-farmer

>> सूरज बागडे, भंडारा

यंदा जुलै महिना सुरू झाला तरी अद्यापही भंडारा जिल्हात समाधानकारक पाऊस न पडल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून लाखांदूर तालुक्यात धानाच्या नर्सरी वाचविण्यासाठी शेतकरी चक्क टँकरने पाणी पुरवठा करून धानाची नर्सरी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत.

लाखांदूर तालुक्यात अद्यापही जोरदार पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांनी धान्याच्या नर्सरी लावल्या मात्र बियाणांची उगवणी होताच पावसाचा खंड पडल्याने अनेक ठिकाणी धान नर्सरी उष्णतेमुळे करपू लागल्या आहेत.धानाच्य नर्सरी वाचविण्यासाठी आता शेतकऱ्यांनी टँकर द्वारे पाणी देणे सुरू केले आहे.लाखांदूर तालुक्यात प्रथमच टँकरने पाणी पुरवठा करण्याची पाळी आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, काही ठिकाणी इटिया डोह धरणाचा पाणी सोडण्यात आल्याने धानाची नर्सरी वाचले तर गोसीखुर्दच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने काही ठिकाणी नर्सरी वाचल्या. मात्र अनेक गावांमध्ये वरथेंबी शेती असल्याने आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.