‘भक्ती: द आर्ट ऑफ कृष्ण’ मुंबईत अनुभवायला मिळणार कृष्ण भक्ती आणि कलेचा अनोखा मिलाप

>> अक्षता महाडिक, मुंबई

हिंदुस्थान एक असा देश आहे जिथे ईश्वराने अवतार घेतेल आहेत. यामध्ये भगवान विष्णुचा आठवा अवतार कृष्णाचा आहे. आबालावृद्ध सर्वांना कृष्णाचं आकर्षण आहे. भगवान कृष्णाच्या प्रत्येक जीवनावस्थेतून काही तरी शिकवण मानवाला मिळते. त्यामुळे कृष्ण भक्तांची संख्या जगभरात फार मोठी आहे. कृष्णाच्या या उपासनेला कलेच्या माध्यमातून सादर करण्याचा एक प्रयत्न ‘भक्ती: द आर्ट ऑफ कृष्ण’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. याचा आनंद सगळ्यांना घेता यावा यासाठी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रसिद्ध नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये ‘द आर्ट ऑफ कृष्ण’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भक्ती: द आर्ट ऑफ कृष्ण’, हे प्रदर्शन भगवान श्रीकृष्णाचे जीवन आणि वारसा याद्वारे वैश्विक प्रेम आणि भक्तीचा शोध घेणारे ऐतिहासिक प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात राजा रवि वर्मा, एम. एफ. हुसेन, मनजीत बावा, अमित अंबालाल, रकीब शॉ आणि थुकराल यांसारख्या पंधरा प्रमुख हिंदुस्थानी कलाकारांच्या एकूण 107 ऐतिहासिक कलाकृतींचा समावेश आहे.

‘द आर्ट ऑफ कृष्ण’ हे प्रदर्शन इतके भव्य आहे की यासाठी 4 मजल्यांचा वापर करण्यात आला आहे. यातील प्रत्येक मजल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षण कलेतून साकारण्यात आले आहे. हे प्रदर्शन कृष्णाच्या जन्मापासून आणि गोकुळमधील बालपण, प्रौढत्वापर्यंत आणि त्याच्या अतींद्रिय शिकवणींद्वारे कृष्ण आणि त्याच्याशी असलेल्या मानवतेच्या नातेसंबंधाची वर्णन करणारे आहे. तसेच श्री कृष्णाच्या जन्मापासून ते अंतापर्यंतच्या प्रवास म्हणजेच मनसा, वाचा, क्रमणा आणि सद्गुणाच्या मार्गाचांही उलगडा करण्यात आला आहे. तसेच या प्रदर्शनातील विशेष आकर्षण म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात उभारण्यात आलेली भगवान कृष्णाची 9 मंदिरे. या 9 मंदिरंमध्ये राजगोपालस्वामी, गुरुवायुरप्पन, उदिपी कृष्ण, हम्पी बालकृष्ण, द्वारकाधीश, श्रीनाथजी, पुरी जगनाथ, मथुरा नाथ आणि श्रीरंगम इत्यादी रुपांचे दर्शन येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना होणार आहे.

श्रीकृष्णाचे विविध रूप आणि त्याची ऐतिहासिक कलाकृतीचे (भक्ती: द आर्ट ऑफ कृष्णा ) हे प्रदर्शन 18 जुलै ते 18 ऑगस्ट 2024 या कालावधीत आर्ट हाऊस, NMACC येथे भाविकांना पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनासाठी 299 रुपये इतके शुक्लही आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.