>> गुरुनाथ तेंडुलकर
युद्धात शंख फुंकण्या मागचे दोन प्रमुख उद्देशांपैकी पहिला उद्देश म्हणजे आपल्या सैन्यात वीरश्री निर्माण करून शत्रूच्या हृदयात धडकी भरवणे आणि दुसरा उद्देश म्हणजे अजूनही जर कुणाला युद्धात भाग घ्यायचा नसेल किंवा भीतीपोटी रणांगण सोडून जाण्याची इच्छा असेल अशा सैनिकांना युद्धापूर्वीच निघून जाण्याची सूचना देणे. कुरुक्षेत्रावर 18 दिवसचा ललेल्या कौरव-पांडव युद्धात शंख फुंकले गेले. पण या शंख फुंकण्या मागेदेखील कौरव आणि पांडव दोन्ही पक्षांची मनोधारणा दिसून येते. कसे ते थोडक्यात पाहूया.
पहिला शंख फुंकला तो कौरवसेनेचे सेनापती भीष्माचार्य यांनी. त्यापाठोपाठ कौरवसेनेतील अनेक वीरांकडून शंखगर्जना झाली. शंखासोबत तुताऱ्या, ढोलताशे, नगारे आणि रणशिंगेशिंगे वाजवून प्रचंड गर्जना करण्यात आली. इतके होऊनही पांडवांच्या सैन्याकडून कोणतेच प्रत्युत्तर दिले गेले नाही. याचा नीट विचार केला तर दोघांच्या मनोवृत्तीतील तफावत ध्यानात येईल. पांडव हे मुळातच सज्जन, पापभीरू, सहनशील आणि दैववादी. स्वतहून कुणाच्या वाट्याला जायचे नाही. कुणी समोरून आडवा आला तरीही त्याला वाट मोकळी करून द्यायची अशा प्रकारची सज्जन चित्तवृत्ती धारण केलेले.
सज्जन या शब्दाची नीट फोड केली तर जो कधीही युद्धासाठी सज्ज नसतो तो सज्जन. आजही आपण आपल्या समाजात हेच पाहतो. सर्वसामान्य मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजहा बहुतांशी सज्ज…नच असतो. कुणाच्या बऱ्यातत नाही. कुणाच्या वाईटात नाही. कारण बरे करायची कुवत नाही आणि वाईट करायची ताकद नाही. आजच्या काळातील मध्यमवर्गीय मनोवृत्तीचे प्रतीक म्हणजे पांडव. अशा सज्जनांना एकत्र आणून त्यांच्यात स्फुल्लिंग जागवणारा कुणी तरी एक कणखर नेता आवश्यक असतो. महाभारताच्या काळात पांडवांचे नेतृत्व केले भगवान श्रीकृष्णाने. कौरवांच्या सैन्यातील शंखनादाला कोणीच पांडव प्रत्युत्तर देईना म्हणून पहिला शंखदेखील भगवान श्रीकृष्णानेच फुंकला आहे ही गोष्ट बरेच काही सांगून जाते.
आणखी एक गोष्ट म्हणजे अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांचा रंग पांढरा शुभ्र आहे. ‘ततः श्वेतै र्हयै युत्तै महति स्यन्दने स्थितौ’ भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायातील 14 व्या श्लोकात असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. वास्तविक युद्धप्रसंगी पांढरा रंग हा सौम्यपणाचा किंबहुना शरणागतीचा मानला जातो. पांडव मुळातच थोडे नेभळट आणि बरेचसे बावळट होते. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सहाय्याला होता म्हणून त्यांचा निभाव लागला. अन्यथा …. आजही आपण हेच पाहतोय, अनुभवतोय. सज्जन माणसे कधीच संघटित नसतात, पण दुर्जनांची मात्र टोळी असते. सज्जन माणसे ‘मला काय करायचेय? त्याचे तो बघेल,’ असा नपुंसक विचार करून इतरांवर होणारे अन्याय दुरून बघतात. बंद दाराआड चर्चा करतात आणि स्वतवर अन्याय होऊ लागला तर, मुकाट्याने सहन करण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय नसतो. अशा वेळी गरज असते ती अशा सज्ज नसलेल्या सज्जनांना सज्ज करणाऱ्या एका कणखर आणि खंबीर नेतृत्वाची. महाभारतात पांडवांच्या बाजूने हे नेतृत्व भगवान श्रीकृष्णाने केले. मोगलांचा अन्याय मुकाट्याने सहन करणाऱ्या महाराष्ट्राला हे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. सवर्ण समाजाचे अन्याय मुकाट्याने सहन करणाऱ्या दलितांना ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असे सांगून
एकत्र आणले ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी. अगदी अलीकडच्या काळात मरगळलेल्या, मुर्दाडलेल्या मराठी मनाला जागृत करण्याचे काम हे हिंदुहृदुदयसम्राट माननीय बाळासाहेबांनी केले. आता आपण पुढच्या श्लोकाकडे वळूया.
अथ व्यवस्थातान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वज
प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुदम्य पांडव ।।20।।
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते
अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मे अच्युत ।। 21 ।।
यावदेतान्निरीक्षे अहम् योद्धुकामान् व्यवस्थितान्
कैर्मयासह योद्धव्यम् अस्मिन रण समुद्यमे ।। 22 ।।
योत्स्यमानानवेक्षे अहम् य एते अत्र समागताः ।
धार्तराष्टस्य दुर्बुद्धे युध्दे प्रियचिकीर्षवाः ।। 23 ।।
भावार्थ : ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने त्यावेळी धनुष्य उचलले आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, “हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा करा. मी रणभूमीवर युद्धासाठी सज्ज झालेल्या सगळ्यांना एकदा नीट पाहून घेऊ इच्छितो. मला कोणाकोणा बरोबर युद्ध करावे लागणार आहे ते मला नीट जाणून घेऊ दे. दुर्योधनाच्या बाजूने युद्धासाठी कोणकोण आले आहेत हे मला एकदा नीट बघायचे आहे.” वास्तविक कोणकोणाच्या बाजूने युद्ध करणार आहे हे अर्जुनाला आधीच ठाऊक होते. किंबहुना आपल्या बाजूने कोण आहेत आणि कौरवांच्या बाजूने कोण लढणार आहेत हे जर त्याला अखेरच्या क्षणापर्यंत ठाऊक नसेल तर त्या अर्जुनाला कोपरापासून हात जोडावेसे वाटतात.
आज आपल्रा देशातला मतदार असाच संभ्रमित अवस्थेत आहे. कोण कोणत्या कारणासाठी कोणत्या पक्षात गेला आहे. भीतीपोटी कुणीकुणाशी युती केली हे सामान्य जनतेला ठाऊकच नाही. आपल्याला नेमके कुणाला मतदान करायचे आहे याची नेमकी कल्पनाच अनेक मतदारांना नाही. आपल्या एकामतामुळे देशाचे आणि पर्यायाने आपले भविष्य आपणच कसे घडवू शकतो याची नेटकी जाणीव करून देणाऱ्या श्रीकृष्णाची आज देशाला नितांत आवश्यकता आहे.