जोनपूरच्या रामपूर परिसरात सिधवान इंडस्ट्रियल परिसरात असलेल्या भदोहीच्या माजी सपा आमदार मधुबाला पासी यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी 1.75 कोटी दागिने आणि 35 लाख रुपयांची चोरी झाली. चोरांनी किचनच्या खिडकीची ग्रील तोडून घरात घुसले. त्यानंतर तिजोरी आणि लोखंडाच्या कपाटातून दागिने आणि पैसे चोरले. ज्यावेळी चोरी झाली त्यावेळी मधुबाला पासी दिल्लीमध्ये होत्या.
चोरीची माहिती मिळताच एडिशनल एसपी क्राईंम ब्रान्च आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. मधुबाला पासी दिवाळी साजरी करण्यासाठी दिल्लीत होत्या. घराची देखभाल त्यांचा चालक राजेश यादव करत होता. याबाबत पासी यांचा पुतणा राकेश कुमार याने रामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राकेश कुमार यांनी सांगितले की, चोरट्यांनी स्वयंपाकघरातील खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी लोखंडी कपाट आणि तिजोरीला लक्ष्य केले. चोरट्यांनी 1.75 कोटी आणि 35 लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. त्यांनी सांगितले की, मधुबाला पासी सध्या दिल्लीत असून त्यांचे पती दिल्लीत रेल्वे मंत्रालयात संचालक आहेत.
यासंदर्भात माहिती देताना मडियाहू क्षेत्र अधिकारी विवेक कुमार यांनी सांगितले की, पासी यांच्या पुतण्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाकडून तपास करण्यात आला आहे. संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.