खोटारडा पंतप्रधान बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? माजी न्यायमूर्तीकोळसे-पाटील यांचा गडकरी यांना सवाल

खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही, असा सवाल माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उद्देशून केला. तुम्हाला संधी आहे. तुम्ही पंतप्रधान होऊ शकता, असेही ते पुढे म्हणाले.

मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा अभीष्टचिंतन सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील म्हणाले, असला खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाहीत? कारण तुम्ही तुमच्या बोलण्यातून सर्वसमावेशक दिसता, आणि तुम्ही जर इतिहास पाहिला तर एकही ब्राह्मण सर्वसमावेशक नेता झालेला नाही. तुम्हाला संधी आहे. तुम्ही पंतप्रधान होऊ शकता. तुम्हाला मी सुयश चिंतितो, असेही ते म्हणाले.

सध्या राजकारणात ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’गडकरी यांचा घरचा आहेर

‘राजकारणाबद्दल माझं मत चांगलं नाही. सध्या राजकारणात ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ केलं जातं,’ असा ‘घरचा आहेर’ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. तसेच ‘जो पक्ष सत्तेत आहे, त्या पक्षात प्रवेशासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र, सत्ता गेली, जहाज पाण्यात बुडू लागलं की, हीच मंडळी उंदरांप्रमाणे आधी उड्या मारतात. आपल्या देशात विचारभिन्नता ही समस्या नाही, तर विचारशून्यता ही समस्या आहे,’ असेही ते म्हणाले.