जाती आणि भाषेचे भेद सोडून हिंदुंनी एकत्र आले पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

हिंदुस्थान हा हिंदु राष्ट्र आहे असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. तसेच जाती आणि भाषेचे भेद सोडून सर्व हिंदुंनी एकत्र आले पाहिजे असे आवाहनही भागवत यांनी केले. राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, कुठलाही समाज एका व्यक्ती आणि कुटुंबापासून नाही बनत. तर त्यांनी व्यापक केलेल्या विचारातून समाज निर्माण होतो. संघ विचाराच्या आधारावर काम करतो. समाजाला एकजूट आणि मजबूत ठेवण्यासाठी संपर्क महत्त्वाचा असतो असेही भागवत म्हणाले. हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे असे भागवत म्हणाले. हिंदु समाजाने भाषा, जाती आणि प्रादेशिक भेद सोडले पाहिजे आणि आपल्या सुरक्षेसाठी एकत्र आले पाहिजे असे आवाहन भागवत यांनी केले. हिंदु समाज प्रत्येकाला आपलं मानतो असेही भागवत यांनी नमूद केले. आपण न्याय, आरोग्य, शिक्षण या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच पर्यावरणाबद्दल जागरुकता, स्वदेशी मुल्य याबद्दल लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे असेही भागवत म्हणाले.