‘बेस्ट’मध्ये या पुढे निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती बंद, शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाचा निर्णय

‘बेस्ट’मध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी गोरगरीब कामगारांची शेकडो पात्र उमेदवार वर्षानुवर्षे ‘वेटिंगवर’ असताना निवृत्त कर्मचाऱयांची कंत्राटी तत्त्वावर भरती करणाऱया प्रशासनाला शिवसेनाप्रणीत ‘बेस्ट’ कामगार सेनेने चांगलेच धारेवर धरल्यामुळे यापुढे निवृत्त कर्मचाऱयांची कंत्राटी भरती बंद करण्यात येईल, असे आश्वासन महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी दिले. शिवाय जे कर्मचारी सध्या कंत्राटी तत्त्वावर भरती केले आहेत ते केवळ तीन महिनेच काम करतील, अशी माहिती ‘बेस्ट’ कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिली.

‘बेस्ट’च्या विविध प्रश्नांसंदर्भात ‘बेस्ट’ कामगार सेनेने महाव्यवस्थापक डिग्गीकर यांची भेट घेऊन सर्व प्रश्न सोडवण्याची मागणी केली. महाव्यवस्थापकांच्या दालनातच ही बैठक झाली. विद्युत पुरकठा विभागात सध्या 570 नैमित्तिक कामगार कायमस्वरूपी करण्यात येणार व मीटर वाचक, बिल वितरक, चौकशी निरीक्षक तसेच अनेक टेक्निकल अधिकारी, कर्मचारी कर्मचाऱयांची रिक्त पदे, वाहतूक विभागातील रिक्त बस वाहकाची 1400 पदे, बस निरीक्षक 125 पदे त्वरित भरण्यात येतील, असे आश्वासनही महाव्यवस्थापकांनी दिल्याचे अध्यक्ष सामंत यांनी सांगितले. यावेळी सरचिटणीस रंजन चौधरी, कार्याध्यक्ष उदय आंबोणकर, उपाध्यक्ष मनोहर जुन्नरे, भूपेंद्र नांदोस्कर, गणेश शिंदे, विभागीय चिटणीस नीलेश मांढरे, प्रकीण परब यांच्यासह बेस्ट प्रशासनाकडून मुख्य प्रशासकीय क्यकस्थापक पाटसुते, प्रशासकीय व्यवस्थापक परमार, पोतनीस, राक, मढावी साखरे, भाटकर अधिकारी उपस्थित होते.

स्वमालकीच्या 3337 बसेस घेणार

 महानगरपालिका आयुक्त, महाक्यकस्थापक क बेस्ट कर्कर्स युनियन यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे बेस्ट उपक्रमाच्या स्कमालकीच्या 3337 बसेस त्करित घेण्यात येतील, असेही महाव्यवस्थापकांनी मान्य केले. काहतूक विभागातील सेकाज्येष्ठतेप्रमाणे अधिकारी-कर्मचाऱयांना पदोन्नती देण्यात येईल.

 शिवाय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकारी यांची ग्रॅच्युइटी, फायनल बिल, वेज बिल ऑग्रिमेंट एरियर्स 30 टक्के देण्यात यावा आणि उर्वरित 70 टक्के रकमेचे नियोजन करून ती रक्कमसुद्धा तातडीने देण्यात येईल, असेही महाव्यवस्थापक म्हणाले.

बेस्टच्या निर्णयामुळे अनुकंपा, पात्र आणि गरजू बेरोजगार उमेदवारांना हक्काची नोकरी मिळेल. शिवाय बेस्ट उपक्रमातील प्रतीक्षा यादीतील बेरोजगार युकक, युकतींना कायमस्करूपी कामाकर घेण्याच्या निर्णयामुळेही फायदा होईल. – सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना