![chhaava (7)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/chhaava-7-696x447.jpg)
सध्याच्या घडीला प्री वेडिंग शूटचा ट्रेंड जोर धरताना दिसत आहे. श्रीमंतांपासून ते अगदी मध्यमवर्गापर्यंत हा ट्रेंड रुजत आहे. लग्नाआधी मुंबईमध्ये प्री वेडिंग शूटसाठी कोणत्या ठिकाणांना अधिक पसंती मिळते हे आपण बघूया. प्री वेडिंग शूटसाठी सर्वात महत्त्वाची तयारी असते ती म्हणजे ठिकाणं शोधण्याची.
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात कोणत्या ठिकाणी जाऊन प्री वेडिंग शूट करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. या प्रश्नावर तोडगा काढून आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी मुंबईतील काही खास ठिकाणे. या खास ठिकाणांवर प्री वेडिंग शूट करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील सोनेरी क्षणांना कॅमेऱ्यात बंदिस्त करु शकाल.
बॅंडस्टॅंड
मुंबईतील बॅंडस्टॅंड हा विभाग प्रेमी युगुलांसाठी आवडता स्पाॅट मानला जातो. याच बॅंडस्टॅंडला प्री वेडिंग फोटो शूट करण्यासाठी, विविध ठिकाणे आहेत.यातील सर्वात आवडता स्पाॅट म्हणजे, समुद्राच्या सोबतीने केलेले फोटोशूट. तसेच तिथे जवळच्या बागेतही प्री वेडिंग फोटो शूट करता येऊ शकते.
क्वीन्स नेकलेस (मरीन ड्राईव्ह)
मरीन ड्राईव्हलाही आपल्याला उत्तम प्री वेडिंग फोटोशूटचा आनंद घेता येईल. मरीन लाईन्सचे सौंदर्य हे शब्दात वर्णन करता येण्याजोगे नाही. म्हणूनच इथला प्रत्येक स्पाॅट हा स्वतःमध्ये वेगळेपण सिद्ध करणारा स्पाॅट आहे. त्यामुळेच हा विभाग प्री वेडिंग फोटो शूटसाठी सर्वात महत्त्वाचा स्पाॅट मानला जातो.
गेटवे आॅफ इंडिया
गेटवे आॅफ इंडियाला समुद्राच्या आणि उगवत्या सूर्याच्या साक्षीने अनेक फोटो कॅमेऱ्यात बंदीस्त करता येऊ शकतात. इथे आजूबाजूला असणारी पंचतारांकित हाॅटेल्स सुद्धा प्री वेडिंग शूटसाठी सुंदर पर्याय आहेत. मुंबईतील हा सर्वात गजबजलेला भाग असला तरी, या भागाची स्वतःची अशी एक खासियत आहे.
काळा घोडा
काळा घोडा हा विभाग मुंबईतील सर्वात जूना आणि सुंदर भाग मानला जातो. इथल्या भिंतीवर असणारी चित्रे या विभागाचे आकर्षण आहे. केवळ इतकेच नाही तर, या विभागाला स्वतःचा असा इतिहास आणि महत्त्वही आहे. तुमचे फोटो संस्मरणीय करायचे असतील तर या विभागाला भेट देण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही.