बेस्टचा प्रवास दुपटीने महागला; किमान तिकीट भाडे 10 रुपये होणार, पासही महागणार

कोटय़वधीच्या आर्थिक तोटय़ात असलेल्या बेस्ट उपक्रमाने अखेर सरासरी तिकिटात आणि पासमध्ये सरसकट दुपटीने वाढ करण्याचे निश्चित केले असून त्याबाबतच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे साध्या बेस्ट बसचे कमीत कमी प्रवासभाडे हे 10 रुपये होणार आहे. एसी बसचे तिकीट 6 रुपयांवरून 12 रुपये होणार आहे तर मासिक पासात तब्बल 350 रुपयांची वाढ होणार आहे. याचा फटका बेस्टने प्रवास करणाऱया 31 लाख 50 हजार प्रवाशांना बसणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या मुंबईकरांना आता बेस्ट भाडेवाढीची झळही बसणार आहे.

गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रम कोटय़वधीच्या आर्थिक तोटय़ात असून दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. आर्थिक काsंडी पह्डण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तिकीट दर वाढीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, शिवसेना तसेच विविध संघटनांनी केलेल्या विरोधानंतर तिकीट दर वाढीचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला होता. त्यामुळे बेस्ट उपक्रमाचा आर्थिक गाडा हाकण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिका प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली. मात्र, या वर्षी बेस्टला मुंबई महापालिकेने केवळ हजार कोटींची मदत केली. मात्र, ती पुरेशी नव्हती, असा आरोप शिवसेना बेस्ट कामगार सेनेने केला होता. दरम्यान, मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या 10 वर्षांत बेस्टला 11 हजार कोटी रुपये मदत म्हणून अनुदानापोटी दिले आहेत.

वातानुकूलित बसेसचे भाडे

किमी सध्याचे भाडे वाढीव भाडे
5 6 रुपये 12 रुपये
10 13 रुपये 20 रुपये
15 19 रुपये 30 रुपये
20 25 रुपये 35 रुपये
25 25 रुपये 40 रुपये

मासिक बस पास

5 कि. अंतरासाठी 450 रुपयांवरून 800 रु.
10 कि. अंतरासाठी 1000 रुपयांवरून 1250 रु.
15 कि. अंतरासाठी 1650 रुपयांवरून 1700 रु.
20 कि. अंतरासाठी 2200 रुपयांवरून 2600 रु.

मासिक बस पास (एसी)

5 कि. अंतरासाठी 600 रुपयांवरून 1100 रु.
10 कि. अंतरासाठी 1400 रुपयांवरून 1700 रु.
15 कि. अंतरासाठी 2100 रुपयांवरून 2300 रु.
20 कि. अंतरासाठी 2700 रुपयांवरून 3500 रु.

साप्ताहिक बस पास

5 कि. अंतरासाठी 70 रुपयांवरून 140 रु.
10 कि. अंतरासाठी 175 रुपयांवरून 210 रु.
15 कि. अंतरासाठी 265 रुपयांवरून 280 रु.
20 कि. अंतरासाठी 350 रुपयांवरून 420 रु.

n मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला तिकीट दरात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. पालिका प्रशासनाच्या मंजुरीनंतर वाहतूक विभाग आणि नगरविकास खात्याची मंजुरी मिळताच तिकीट दरवाढ लागू करण्यात येणार आहे. येत्या एक ते दोन दिवसांत वाहतूक विभाग व नगर विकास खात्याची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

किमी सध्या वाढीव भाडे
5 5 रुपये 10 रुपये
10 10 रुपये 15 रुपये
15 15 रुपये 20 रुपये
20 20 रुपये 30 रुपये
25 20 रुपये 35 रुपये