मोबाईलवर बोलत जात असताना एका व्यक्तीला बेस्टची धडक लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास मंत्रालयाजवळ घडली. या घटनेत प्रवाशाच्या डोक्याला मार लागला असून त्याला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चर्चगेट स्थानक ते महात्मा फुले मार्केटदरम्यान बेस्ट बस रुट नंबर 113 ही बस प्रवासी सेवेत धावते. ही बस बॅकबे डेपोतील असल्याने शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास डेपोत जात होती. यावेळी मोबाईलवर बोलत जाणाऱ्या व्यक्तीला बसच्या मागील भागाचा धक्का लागून अपघात झाला.