
सध्याच्या घडीला जंक फूड आणि बाहेरचे अन्न आपण खात असल्यामुळे, दिवसागणिक आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यावर, आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती ही उत्तम असणे हे खूप गरजेचे आहे. आपला आहार योग्यरित्या ठेवल्यास आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी काही फळे ही खूप महत्त्वाची मानली जातात.
प्रतिकारशक्ती वाढविणारी फळे
पेरू- पेरुमध्ये व्हिटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी हे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी खूप गरजेचे असते. म्हणूनच पेरूचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे.
पपई- पचनासाठी उत्तम म्हणून पपईचा आपण रोज आहारात समावेश करतो. परंतु पपईमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. हेच व्हिटॅमिन ई रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
लिची- लिचीचे फळ अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे, अन्न लवकर पचते. तसेच आपली रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. लिचीमध्ये अँटीवायरल गुणधर्म फार मोठ्या प्रमाणात आढळतात.
डाळिंब- डाळिंब कोणत्याही हंगामात उपलब्ध असते. डाळिंबामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. डाळिंबामध्ये दाहक गुणधर्म असतात, त्यामुळे चयापचय वाढते. डाळिंबामुळे शरीरामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाणही वाढते.
अननस- अननस हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम मानले जाते. मुख्य म्हणजे अननस आपण कोणत्याही ऋतुमध्ये खाऊ शकतो. अननसामध्ये व्हिटॅमिन सी, मॅंगनीज आणि अॅंटिआॅक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत असतो. यामुळे प्रतिकारशक्ती वाढीसाठी मदत मिळते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)