बेस्टच्या वीजपुरवठा विभागातील जोडारी सहाय्यक पदासाठी भरती सुरू झाली असून त्यासाठी बेस्टकडून प्रशिक्षित उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. बेस्टच्या वीजपुरवठा विभागात असंख्य पदे रिक्त असून ती तातडीने भरावीत, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पालिका सहाय्यक आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे केली होती. ती मागणी मान्य करत वीजपुरवठा विभागातील रिक्त पदांच्या भरतीचे परिपत्रक बेस्टकडून काढण्यात आले आहे.
बेस्टच्या वीजपुरवठा विभागात गेल्या काही वर्षांपासून भरती बंद असून आवश्यक असलेल्या विभागातही कर्मचाऱयांची कमतरता आहे. त्या पार्श्वभूमीवर बेस्टचा वीजपुरवठा उपक्रम सुरळीत सुरू राहावा आणि त्याचा फटका मुंबईकरांना बसू नये यासाठी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली होती. अश्विनी जोशी यांनी ही मागणी मान्य करत एमईआरसीमध्ये नियमानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता जोडारी सहाय्यक या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.