बेस्ट वाहकाकडून प्रवाशाला मारहाण प्रवाशांमध्ये संताप

गेल्या काही दिवसांमध्ये बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे एक से बढकर एक प्रकार समोर येत असताना बेस्टच्या वाहकाने प्रवाशाला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली.

बस मार्ग क्रमांक 382 सिरीयल नंबर 39, बस क्रमांक 6941 ची बस देवनार आगाराची असून सहार कार्गे ते अणुशक्ती नगर अशी जात असताना घाटकोपर आगाराच्या मागे साधारण 12.00 वाजण्याच्या दरम्यान दोन मुले बसमध्ये चढली. बस वाहकाने प्रथम तिकिटाबद्दल विचारले असता मुले मोबाईलमध्ये खेळत होती म्हणून इतर प्रवाशांचे तिकीट काढून पुन्हा त्यांना तिकीट काढण्याबद्दल विचारले असता त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी झालेल्या बाचाबाचीप्रसंगी वाहकाने मुलाच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला.