मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात भाविक तसेच पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी गणपती मंडळांना भेट देता यावी, या उद्देशाने बेस्टतर्फे रात्री 10.30 ते सकाळी 6 या वेळेत 24 विशेष बसगाड्या चालविल्या जाणार आहेत. 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीत या विशेष बसगाड्या चालविल्या जातील.
दक्षिण मुंबईतून उत्तर-पश्चिम मुंबई परिसराकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूर आदी मार्गे या बस चालविल्या जातील. यात मार्ग क्रमांक 4 मर्यादित, 7 मर्यादित, 8 मर्यादित, ए-21, ए-25. ए-42, 44, 66, 69 आणि सी- 51 यांचा समावेश आहे. प्रवाशांनी मागणी केल्यास आणखी काही मार्गांकर अशी सेवा दिली जाईल, असे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.