मुंबईत चोरीच्या उद्देशाने एका चोराने बेस्टच्या कंडक्टरवर हल्ला केला आहे. चोराने कंडक्टरला भोसकले असून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शहबाझ खानला अटक केली आहे. पण या घटनेमुळे बेस्टचे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बेस्टमध्ये काम करणाले अशोक डांगळे हे कामावर होते. डांगळे सात क्रमांकाच्या बसमध्ये कार्यरत असताना धारावीच्या पिला बंगलो स्टॉपवर शहबाझ खानने डांगळे यांना लुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डांगळे यांनी खानला विरोध केला. तेव्हा खानने चाकूने डांगळे यांना भोसकलं. डांगळे यात गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णायलयात दाखल केले. पण त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शहबाझ खानला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.