
बॅटरीत बिघाड झाल्याने चर्चगेट स्टेशनजवळ बेस्ट बसने पेट घेतला. चालकासह 8 प्रवासी सुरक्षित बाहेर पडले. दरम्यान, ठाणे येथे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ असलेल्या कोपरी सीएनजी पंपाजवळ रात्री 10 च्या सुमारास बेस्ट बसचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात 30 प्रवासी बचावले असून 5 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.