मुंबईत बेस्ट, अदानीची वीज महागणार

मुंबईतील वीज पुरवठादार कंपन्या अदानी आणि बेस्टच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अदानी कंपनीच्या 101 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या तसेच बेस्टच्या 301 ते 500 आणि पाचशेपेक्षा अधिक युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांची वीज महागणार आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ होईल. अदानीच्या ग्राहकांना 101 ते 300 युनिटपर्यंत प्रतियुनिट 9 रुपये 63 पैसे आकारले जातील तर बेस्टच्या 301 ते 500 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 11 रुपये 91 पैसे तर पाचशेपेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना 14 रुपये 11 पैसे मोजावे लागणार आहेत.