
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राष्ट्रांवर टॅरिफ लादल्याने जगभरात अस्वस्थता पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत टॅरिफ आणि इस्रायल हमास संघर्ष तसेच इराणसोबत वाढत असलेला तणाव यासह जगभरातील अनेक विषयांवर चर्चा झाली. तसेच या भेटीनंतर अमेरिकेची भूमिका काय असणार याकडे जगाचे लक्ष आहे.
नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना भेटून टॅरिफबाबत आणि गाझा संघर्षाबाबत चर्चा केली.इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या अल्पकालीन युद्धबंदीचा करार मोडला गेला आहे आणि इराणसोबत तणाव वाढत आहे. त्यामुळे ही भेच महत्त्वाची मानली जात आहे. ट्रम्प यांनी वेस्ट विंगच्या बाहेर नेतन्याहू यांचे स्वागत केले आणि त्यांना मिठी मारत दोन्ही देशातील संबंध दृढ असल्याचे दाखवून दिले. जगाला हादरवून टाकणाऱ्या अमेरिकेच्या ट्ररिफपासून दिलासा देण्याची विनंती करणारे ते पहिलेच नेते आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यातील अल्पकालीन युद्धबंदी कराराचे उल्लंघन झाले आहे. तसेच इराणशी तणाव वाढत आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी अमेरिका पुढाकार घेईल, असे ट्रम्प यांनी नेत्यानाहू यांना सांगितले. ट्रम्प यांनी पदभार स्विकारल्यानंतरचा नेत्यानाहू यांचा हा दुसरा अमेरिका दौरा आहे. अमेरिकेने इस्रायलवर 17 टक्के टॅरिफ लादल्यानंतर ही भेट झाल्याने अमेरिकेच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष आहे.
गाझामध्ये असलेल्या ओलिसांबाबत, तसेच तेथील संघर्षाबाबत आणि इस्रायलवर लादलेल्या ट्ररिफबाबत आपली ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्याचे नेत्यानाहू यांनी सांगितले. बदलत्या जागतिक वातावरणात अमेरिका आणि इस्रायलमधील संबंध महत्त्वाचे असल्याचे नेत्यानाहू म्हणाले. या भेटीत व्यापार आणि इतर जागतिक विषयांवरही चर्चा झाली आहे. सध्या मध्य पूर्वेत अनेक गोष्टींमुळे अशांतता निर्माण झाली आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज दोन्ही देशांनी व्यक्त केली आहे.