बंगळुरू मेट्रोचे तिकीट वाढताच प्रवाशांची पाठ

बंगळुरू मेट्रोने तिकीट दरात वाढ करताच प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. जवळपास 6 लाख प्रवाशी कमी झाल्याने मेट्रोच्या उत्पन्नात घट झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मेट्रोच्या तिकीट दरवाढीला केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. मेट्रोच्या तिकीट दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारने सादर केला. परंतु, याचा अंतिम निर्णय उच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या समितीने याला मंजुरी दिली, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या मेट्रोचे तिकीट 10 रुपये ते 90 रुपयांपर्यंत आहे.