
लग्नानंतर शरीरसंबंध ठेवण्यासाठी पत्नीने पैशाची मागणी करत मानसिक आणि शारीरित छळ केल्याचा आरोप करत बंगळुरुतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने पोलिसात धाव घेतली आहे. व्यालिकल पोलीस ठाण्याविरोधात पतीने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे पत्नीनेही पतीविरोधात कौटुंबिक हिसाचाराची तक्रार दाखल केली आहे.
‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार श्रीकांत आणि बिंदुश्री यांची लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख झाली आणि ऑगस्ट 2022 मध्ये दोघांनी लग्न केले. मात्र लग्नापूर्वीच सासूने आपल्याकडे पैशांची मागणी केली. यासाठी सासूच्या खात्यात 3 लाख रुपयेही टाकले. तसेच लग्नातील खर्चासाठी 50 हजार रुपयेही दिले, असा दावा श्रीकांतने केला.
लग्न होऊन दोन वर्षाहून अधिक काळ लोटला असून यादरम्यान पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. तसेच शरीरसंबंध ठेवायचे असेल तर दिवसाला 5 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. एवढेच नाही तर पत्नीशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता ती चिठ्ठीत नाव लिहून आत्महत्येची धमकी द्यायची. तसेच गुप्तांगाला इजा करून खुनाचा प्रयत्नही केला, असा आरोपही श्रीकांतने केला.
बिंदुश्री आणि तिच्या आईने घरासाठी गृहकर्ज घेतले होते. या घराचा हप्त भरण्यासाठी पत्नी आणि तिच्या कुटुंबाने माझ्याकडे 75 हजार रुपये प्रति महिना देण्याची मागणई केली होती. यास नकार दिल्यावर माझा छळ करण्यात आला. वर्क फ्रॉम होम करत असताना पत्नी त्रास द्यायची. मिटिंग सुरू असताना पत्नी जाणूनबुजून त्यात व्यत्यय आणायची, वाद घालायची आणि स्क्रिनसमोर येऊन डान्सही करायची. यामुळे मला नोकरीही गमवावी लागली. पुरावा म्हणून आपण तिच्या या विचित्र कृत्याचे व्हिडीओही चित्रित केल्याचा दावा श्रीकांतने केला. या छळाला कंटाळून आपण घटस्फोट मागितले तेव्हा पत्नीने 45 लाख रुपयांची मागणी केली, असा आरोपही श्रीकांतने केला.
दरम्यान, श्रीकांत आणि त्याच्या कुटुंबाने आपला कौटुंबिक छळ केल्याचा आरोप बिंदुश्रीने केला आहे. हुंड्यासाठी माझा छळ करण्यात आला, मला मोलकरणीसारखे वागवले गेले, असा आरोप बिंदुश्रीने केला आहे. एवढेच नाही तर श्रीकांतच्या कुटुंबाने आपल्याला बेडरुममध्ये सीसीटीव्ही लावण्याचाही सल्ला दिला होता, असा दावाही तिने केला. यानंतर आता पोलिसांनी दोघांनाची चौकशीसाठी बोलावले आहे.