विद्यार्थ्याच्या वडिलांसोबत अनैतिक संबंध, नंतर आक्षेपार्ह फोटो दाखवून पैसे उकळत होती शिक्षिका

कर्नाटकमधील बंगळुरू येथे पोलिसांनी एका शिक्षिकेला अटक केली आहे. श्रीदेवी रुदागी (25) असे त्या शिक्षिकेचे नाव असून तिचे ती शिकवत असलेल्या शाळेतील एका विद्यार्थ्याच्या वडिलांसोबत (सतीश- नाव बदललले आहे) अनैतिक संबंध होते. नंतर ती सतीशचे आक्षेपार्ह फोटो दाखवून त्याच्याकडून पैसे उकळत होती.

ट्रेडिंगचा व्यवसाय करणारा सतीश हा त्याच्या पत्नी व तीन मुलांसह बंगळुरूमध्ये राहत होता. त्याची सर्वात लहान मुलगी ज्या शाळेत शिकत होती तिथेच श्रीदेवी शिक्षिका होती. शाळेतील मिटिंग्सच्या निमित्ताने श्रीदेवी व सतीशची ओळख झाली व त्यानंतर ओळखीचे रुपांतर अफेयरमध्ये झाले. श्रीदेवी व सतीशमध्ये अनैतिक संबंध देखील होते. त्याचवेळी श्रीदेवीने त्यांचे फोटो व व्हिडीओ देखील काढले होते.

काही दिवसांनी श्रीदेवीने तेच फोटो व्हिडीओ वापरून सतीशला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तिने सतीशकडून 20 लाख रुपये मागितले. सतीशने तिला 1.90 लाख दिले देखील मात्र श्रीदेवी व तिचे दोन साथिदार गणेश काळे व सागर हे सतत सतीशला त्रास देत होते. त्यामुळे वैतागलेल्या सतीशने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी श्रीदेवी, गणेश काळे व सागर यांना अटक केली.