ना घरच्यांची तमा, ना जगाची पर्वा; चालत्या दुचाकीवर कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. दररोज अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत असतात. अशातच कर्नाटकातील बंगळुरूमधून एका जोडप्याचा बुलेटवर स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कहर म्हणजे या बुलेटवर तरुणी पेट्रोलच्या टाकीवर बसून प्रवासाचा आनंद घेत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यांचा हा खुल्लमखुल्ला रोमान्स पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

सदर व्हिडीओ एक्सवर पोस्ट करण्यात आला असून सर्जापूर मुख्य रस्त्यावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडपं दुचाकीवर एकमेकांना घट्ट मिठी मारून प्रवास करताना दिसत आहे. तरुण बिना हेल्मेट दुचाकी चालवत असून तरुणी तरुणाला घट्ट मिठी मारून पेट्रोलच्या टाकीवर बसून प्रवासाचा आनंद घेत आहे. भर ट्रॅफीकमध्ये धोकादायक पद्धतीने हे जोडपं प्रवास करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या हुल्लडबाजीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असती. तसेच इतर वाहनांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा काही जणांनी केली आहे.