मागून आला आणि नको तिथे स्पर्श केला, बंगळुरूत भररस्त्यात महिलेसोबत भयंकर घटना

बंगळुरूतील सुदागुंटेपाल्या भागातून जात दोन तरुणी जात असताना मागून आलेल्या एका तरुणाने तरुणीची छेड काढत तिला नको तिथे स्पर्श केला. या घटनेचे धक्कदायक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तरुणीने अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केली नसली तरी पोलिसांनी त्याची सू मोटू दखल घेत तपास सुरू केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सुदागुंटेपाल्या भागातून रात्रीच्या वेळेस दोन तरुणी जात असताना एक तरुण त्यांचा पाठलाग करताना त्या व्हिडीओत दिसत आहे. काही वेळातच तो तरुण त्यांच्या पुढे उभा राहतो व त्यातील एका तरुणीला नको त्या ठिकाणी स्पर्श करतो. ही घटना 3 एप्रिलला घडली आहे.या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस त्या भागातील इतर सीसीटीव्ही देखील तपासत आहेत.