![neehar (36)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-36-696x447.jpg)
सध्याच्या घडीला बाॅयफ्रेंड जीन्सची चलती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. परीधान करण्यासाठी अतिशय आरामदायक जीन्स म्हणून बाॅयफ्रेंड जीन्सचा पर्याय निवडला जातो. फॅशन तज्ज्ञांच्या मते बाॅयफ्रेंड जीन्स ही ट्रेंडस्चा एक उत्तम नमुना आहे. मोकळी ढाकळी सैलसर असलेली ही जीन्स अनेकींसाठी आरामदायक पर्याय आहे. खासकरुन बारीक मुली महिलांच्या जोडीला शरीरयष्टी असणारी महिला आणि मुलीही बाॅयफ्रेंड जीन्सला पसंती देऊ लागल्या आहेत. बाॅयफ्रेंड जीन्सची महत्त्वाची खासियत म्हणजे यामध्ये कंबरेला इलास्टिकचा पर्याय असल्याकारणाने कुठेही पोटाला बटण रुतत नाही.
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-38.jpg)
बाॅयफ्रेंड जीन्स हे नाव का पडले?
बाॅयफ्रेंड जीन्स ही घालण्यासाठी अतिशय आरामदायक असल्यामुळे या जीन्सची लोकप्रियता फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. बाॅयफ्रेंड जीन्स हे नाव या जीन्सला पडण्यामागे सुद्धा एक रंजक कथा आहे. परदेशातील मुली आरामदायक पर्याय म्हणून आपल्या पुरुष पार्टनरची जीन्स वापरत असत. तिथूनच या जीन्सला बाॅयफ्रेंड जीन्स हे नाव पडले.
बाॅयफ्रेंड जीन्सचा इतिहास
बाॅयफ्रेंड ही जीन्स तब्बल चाळीस वर्षांपेक्षा जास्त जुनी जीन्स मानली जाते. बाॅयफ्रेंड जीन्स 1960 मध्ये सर्वात पहिल्यांदा अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मर्लिन मनरो हीने घातली होती. तेव्हा मात्र या जीन्सला कोणतेही नाव पडलेले नव्हते.
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-37.jpg)
काय आहेत बाॅयफ्रेंड जीन्स घालण्यामागचे फायदे
मांड्याच्या भागांना ही जीन्स मोकळी ढाकळी असल्याकारणाने या जीन्सला सध्याच्या घडीला मुली आणि महिलांकडून अधिक पसंती मिळत आहे.
घाई गर्दीच्या वेळी सुटसुटीत पेहराव म्हणून बाॅयफ्रेंड जीन्सला सर्वच स्तराच्या महिलांकडून पसंती मिळत आहे.
ही जीन्स घट्ट नसल्याने प्रवास करताना अतिशय आरामदायक अनुभव मिळतो.