Watermelon Benefits – उन्हाळ्यात त्वचेची चमक वाढविण्यासाठी कलिंगड आहे सर्वात भारी! वाचा सविस्तर

उन्हाळ्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये विविध प्रकारची फळे दिसतात. यातील सर्वात महत्त्वाचे फळ म्हणजे कलिंगड. लालचुटूक कलिंगडाची फोड म्हणजे उन्हाळ्यातील तहानेवरील हमखास आणि फायदेशीर उतारा.. कलिंगड या फळामध्ये असलेले पाण्याचे प्रमाण आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करते. बाजारात एव्हाना आपल्याला कलिंगडाचे ढिग दिसू लागले आहेत. हे पाहून तुम्हालाही कलिंगड खाण्याची इच्छा होणे ही स्वाभिवकच आहे. कलिंगड हे लहानांपासून ते मोठ्यांना सर्वांनाच आवडते. कलिंगडाचा ज्यूस ते कलिंगडाचे फ्रूट सलाड अशा नानाविध पद्धतीने आपण कलिंगड खाण्यासाठी वापरू शकतो. आता आपण बघूया गर्मीच्या दिवसांमध्ये कलिंगड खाण्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे.
 
उन्हाळ्यात कलिंगड का खायला हवं?
कलिंगडामध्ये लाइकोपिन नावाचा एक घटक आढळतो, हा घटक त्वचेची चमक वाढविण्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. 
कलिंगडामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणामुळे कलिंगड हे आपल्याला दिवसभर ताजेतवाने आणि हायड्रेट ठेवते. 
कलिंगड हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सुद्धा मदत करते. कलिंगडामध्ये मुबलक असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरात होणारी जळजळही कलिंगड खाल्ल्यावर कमी होते. 
कलिंगडाच्या सेवनामुळे हृद्याचे आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होते. कलिंगड उच्च रक्तदाबावरही गुणकारी असल्याचे म्हणूनच मानले जाते. 
दातांच्या आरोग्यासाठी कलिंगड हे खूप महत्त्वाचे मानले जाते. कलिंगडामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे हिरड्यांचे आरोग्यही चांगलेच सुधारते. 
पोटांच्या समस्येवर कलिंगड रामबाण उपाय मानला जातो. कलिंगडाच्या सेवनामुळे पोट साफ होण्यासही मदत होते.
कलिंगडाच्या फोडीसोबत कलिंगडाची सालही उपयुक्त आहे. कलिंगडाची साल त्वचेला उजाळा देण्याचे महत्त्वाचे कार्य करते.
(वरील कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)