Tomato Soup- हाडांच्या मजबूतीसाठी आहारात रोज टोमॅटो सूपचा समावेश करा, टोमॅटो सूप पिण्याचे आहेत असंख्य फायदे!

आहार हा चौरस असणे हे कायम गरजेचे आहे. त्यामुळेच आहारामध्ये इतर भाज्यांसमवेत सूप असणे हे केव्हाही हितावह आहे. सूप आपल्या शरीरामध्ये उर्जा निर्माण करते. तसेच आपल्याला निरोगी राहण्यासही मदत करते. अनेकदा घरी सूप करायचे म्हटल्यावर, कुठले करायचे असा प्रश्न पडला की, केवळ टोमॅटो असे अनेक घरांमध्ये उत्तर मिळते.

टोमॅटो सूप पिण्याचे खूप फायदे आहेत. मुख्य म्हणजे टोमॅटो अगदी सहजासहज कुठेही उपलब्ध होतात. तसेच याकरता स्पेशल अशी काही तयारी करणेही गरजेचे नसते. त्यामुळे हे सूप अगदी झटकन होते.

टोमॅटोमध्ये व्हिटामिन ए तसेच कॅल्शियम असते जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर असते. 

 

 

टोमॅटोचे सूप नियमित प्यायल्यास हाडांना मजबूती मिळते. 

 

टोमॅटोच्या सूपमध्ये कॉपरची मात्रा असते. तसेच पोटॅशियमही असते. ज्यामुळे मेंदूची ताकद वाढते.

 

टोमॅटोच्या सूपमध्ये व्हिटामिन ए आणि सी असते. व्हिटामिन ए पेशींच्या विकासासाठी गरजेचे असते. तसेच शरीरासाठी 16 टक्के व्हिटामिन ए आणि 20 टक्के व्हिटामिन सीची गरज असते. टोमॅटो सूप प्यायल्याने ही गरज पूर्ण होते.

 

 टोमॅटो सूप ऑलिव्ह ऑईलमध्ये बनवल्यास वजन कमी कऱण्यास फायदा होतो. यात पाणी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.

 

 

टोमॅटोच्या सूपमध्ये लायकोपिन आणि कॅरोटोनॉईड सारखे अँटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे महिला आणि पुरुष दोघांमध्ये कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

 

डायबिटीजचा त्रास असणाऱ्यांनी टोमॅटो सूप जरुर प्यावे. यात क्रोमियम असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)