निरोगी आरोग्यासाठी सूर्यनमस्कार आहे खूप गरजेचा! वाचा सूर्यनमस्काराचे महत्त्व

सूर्यनमस्कार म्हणजे संपूर्ण शरीराचा व्यायाम. यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण क्रिया उत्तम चालते. तसेच सूर्यनमस्कारातील आसनांमुळे शरीराला एक लय प्राप्त होते. आपल्यामध्ये चपळता निर्माण होते.  दहा मिनिटे सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीरातील जवळपास 140 कॅलरी जळतात. म्हणजे कॅलरी जळण्याचे प्रमाण हे पोहण्यापेक्षाही जास्त आहे. म्हणूनच सूर्यनमस्कार एक उत्तम व्यायाम प्रकार म्हणून ओळखला जातो. यामुळे पाठ तसेच आपल्या शरीरातील स्नायुंना बळकटी प्राप्त होते. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर सुद्धा सूर्यनमस्कार केल्यामुळे नियंत्रणात ठेवता येते. चयापचय सुधारते तसेच स्त्रियांना मासिक पाळीत होणारे त्रासही यामुळे कमी संभवतात.
 
 
 
सर्वात मूलभूत सूर्यनमस्काराचा लाभ म्हणजे लवचिकता. सूर्यनमस्कारामुळे हाडे आणि स्नायूंना चांगली मजबूती मिळते. हाडांचे आणि स्नायूंचे आरोग्य सूर्यनमस्कारामुळे सुधारते.  
 
सकाळी सूर्यनमस्काराचा सराव केल्याने तुमच्या शरीराला कोवळा सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता तुम्हाला भासत नाही.
 
सूर्यनमस्कार म्हणजे एक नैसर्गिक आणि युनिव्हर्सल जिम आहे. ही आसने आपण कुठेही करु शकतो. आसनांचा योग्य सराव केल्यास कार्डिओ कॉम्बो म्हणून काम करते.
सूर्यनमस्कार शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करून आणि रक्त परिसंचरण सुधारून शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजनची पातळी वाढते त्याचा शरीराला फायदा होतो.
 
सूर्यनमस्कार आपल्या शरीरातील पाचक प्रणालीस उत्तेजित करते. सूर्यनमस्कारामुळे योग्य पाचन रस उत्तेजित होऊन आतड्याला फायदा होतो ज्यायोगे परिणामी पचन चांगले होते. संतुलित आहार आणि विश्रांतीसमवेत सूर्यनमस्कार शरीराच्या संपूर्ण पाचन तंत्राला चालना देते.
 
सूर्यनमस्काराचा सराव कायम केल्यामुळे सायटिका, सांधेदुखी, मज्जातंतू विकार इत्यादी आजारांच्या समस्या कमी होतात.
 
सूर्यनमस्कार अभ्यास करताना श्वास घेताना आणि सोडताना फुफ्फुसांना योग्य पद्धतीने आक्सिजन मिळतो.
 
सूर्यनमस्काराचा नियमित सराव केल्याने केवळ शारीरीक स्वास्थ्य लाभत नाही. तर मानसिक रोगांवरही मात करता येते.
(कोणताही व्यायाम प्रकार करण्याआधी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)