
आपल्या रोजच्या आहारात सूपचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. सूप आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त मानले जाते. मूळात सूप हे पचनासाठी सुद्धा हलके असल्यामुळे, सूपचा आपल्या आहारात समावेश खूप गरजेचा आहे. तुम्हीही वाढत्या वजनाने हैराण असाल तर वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात छोटे छोटे बदल करा. रात्रीच्या जेवणात सूप पिल्यास, तुमच्या शरीराचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

पालक सूप

वजन कमी करण्यासाठी पालक सूपचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यासाठी तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकते.
पालक सूप तयार करण्यासाठी, प्रथम 1 कप पालक घ्या.पालकची सर्व पाने चांगली धुवून घ्या.नंतर एका पातेल्यात बटर टाकून त्यात पालक टाका.त्यानंतर त्यात लसणाच्या कळ्या, कांदा, मिश्र भाज्या आणि फुल क्रीम टाका.सर्वकाही व्यवस्थित शिजल्यावर गॅसवरून उतरवा. त्यानंतर ते बारीक करून घ्या. घ्या तुमचे सूप तयार आहे.
भोपळ्याचे सूप

भोपळ्याचे सूप देखील शरीराचे वजन कमी करू शकते.यासाठी कुकरमध्ये भोपळा चांगला उकडवून घ्या.यानंतर भोपळा चांगला मॅश करावा आणि त्यात काळी मिरी आणि थोडी क्रीम मिसळा.आता त्यावर थोडी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.हवे असल्यास त्यात मीठ घालू शकता.हे सूप रोज रात्रीच्या जेवणात घेतल्याने शरीराचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.
मसूर सूप

जलद वजन कमी करण्यासाठी तुम्ही मसूरच्या डाळीचे सूप सेवन करू शकता.एका भांड्यात कांदा, सेलेरी, लसूण, मसूर आणि टोमॅटो घाला. त्यानंतर त्यात मीठ आणि मिरपूड घाला.यानंतर तुमच्या चवीनुसार थोडे मसाले घाला.सर्वकाही चांगले मिसळा आणि शिजवा.साधारण 18 ते 20 मिनिटांनी मसूर आणि सर्व गोष्टी नीट शिजल्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.