उन्हाळ्यामध्ये आहारात पौष्टिक कोशिंबीरीचा समावेश नक्की करा आणि आरोग्य जपा

पानातला डाव्या बाजूचा पदार्थ म्हणजेच कोशिंबीरी. कोशिंबीरी हा असा प्रकार आहे की, कधी कधी नुसती पोळी आणि कोशिंबीर पानात असेल तरी परीपूर्ण आहार होतो. आपण विविध प्रकारे कोशिंबीरी बनवू शकतो. यासाठी आपण स्वयंपाकघरात उपलब्ध अनेक प्रकारचे घटक वापरून कोशींबीर बनवू शकतो. आज आपण असेच निरोगी सलाड किंवा कोशींबीरीचे प्रकार पाहणार आहोत. हे सर्व प्रकार शरीराच्या दृष्टीने हितावह आहेच. शिवाय करायलाही अगदे साधे सोपे असेच आहेत.

राजमा सलाड – तुम्हाला राजमा आवडत असेल तर तुम्ही कोशिंबीरीतही वापरु शकता. याकरता उकडलेला राजमा आणि मूठभर मिक्स भाज्या आपल्याला हव्यात.

राजमा मूठभर उकडून घ्यावा. त्यामध्ये १/२ कप उकडलेला हरभरा, १ कांदा, कप कोबी, १ टीस्पून लिंबाचा रस, टीस्पून चाट मसाला, २ टीस्पून चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ असे सर्व घालून मिश्रण एकजीव करावे.

 

फळं आणि अक्रोड कोशिंबीर – फळे आणि अक्रोड दोन्ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यापासून बनविलेले कोशिंबीर खाल्ल्यानंतर लगेच भूकही लागणार नाही.

आपल्या आवडीची फळे आणि अक्रोडचे तुकडे एकत्र करावेत. तसेच यामध्ये आपण विविध प्रकारची फळे घालावीत. या कोशींबीरसाठी 1 केळे, 1 सफरचंद, 6 स्ट्रॉबेरी, 1 किवी, 1 चमचे मध, 10 बदाम, 10 अक्रोड, 10 मनुका आणि 2 चमचे भोपळा बिया आवश्यक आहेत. हे सर्व मिक्स करावे. खासकरून वजन कमी करणारे आहेत त्यांनी ही कोशिंबीर अवश्य करून खावी.

अंकुरीत कडधान्याची कोशिंबीर – वजन कमी करण्यासाठी आपण या कोशिंबीरचे सेवन करू शकता. यासाठी मुगाची डाळ चांगली भिजवा आणि नंतर कोशिंबीरीसाठी वापरा.

स्प्राउट्समध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त आहे. हे कॅलरीमध्ये खूप कमी आहे, जे वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला १ कप अंकुरलेली मूग डाळ, कांदा, १ काकडी, १ टोमॅटो, १ टेस्पून लिंबाचा रस, १/२ टीस्पून मिरपूड पावडर, टीस्पून चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आवडीनुसार.