फक्त पिकलेलीच नाही तर कच्ची पपई तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे, जाणून घ्या

रक्तदाबाची औषध घेताना पपईचे सेवन करणं आरोग्याला धोकादायक आहे. यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते.
बाजारात पपई घेताना आपण कायम पिकलेली पपई घेतो. पण केवळ पिकलेलीच नाही तर, कच्ची पपई सुद्धा आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. कच्च्या पपईमध्ये जीवनसत्व अ, क आणि ई मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे आपली त्वचा उत्तम सुंदर आणि तरुण तजेलदार राहते. 
पिकलेली पपई जशी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते, त्याचप्रमाणे कच्ची पपई देखील उपयुक्त आहे. कच्ची पपई पोटाचे आजारही बरे करते. याशिवाय कच्च्या पपईचा उपयोग सांध्यांच्या समस्यांवरही केला जातो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कच्च्या पपईचाही वापर करू शकता.
कच्च्या पपईमध्ये पपेन नावाचा पदार्थ असतो, जो तुमच्या शरीरासाठी चांगला असतो. कच्ची पपई जर योग्य प्रमाणात खाल्ली तर ती पचनासाठी फायदेशीर ठरते. 
कच्च्या पपईत मोठ्या प्रमाणात ‘अ’, ‘ई’ आणि ‘क’ जीवनसत्व असते. ही जीवनसत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. सर्दी आणि पडसं यांचा कोणाला त्रास असेल कच्ची पपई खावी. मुत्रविकारांसंबंधी समस्यांचेही कच्ची पपई निराकरण करते.

कच्च्या पपईमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे तुमची त्वचा निरोगी बनवतात. याच्या सेवनाने शरीरातील कोणतीही जखम किंवा जखम भरून काढण्याची क्षमता वाढते. 
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे हे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी कच्ची पपई खाल्ल्याने अरबट-चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. 
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)