
आयुर्वेद या शास्त्राने आपल्याला भरपूर काही देऊ केले आहे. म्हणूनच पूर्वापार चालत आलेले आर्युवेदिक उपाय आजही लोकप्रिय आहेत. काही छोट्या गोष्टी आपण केल्या तर, आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा उत्तम असते. असाच एक पूर्वापार चालत आलेला आर्युवेदातील प्रकार म्हणजे नाभीत तेल घालणे. नाभीत तेल घालणे हे आपल्या त्वचेच्या बरोबरीने आपल्या शारीरीक आरोग्याच्या दृष्टीनेही हिताचे असते. असं म्हणतात की, रात्री झोपण्याआधी नाभीत तेल घालणं हे खूप हिताचे असते. नाभी हा आपल्या शरीरातील असा एक बिंदू आहे, यामध्ये तेल घातल्याने खूप सारे फायदे होतात.
नाभीमध्ये तेल घालण्याचे कोणते फायदे होतात?
रात्रीच्या वेळी झोपण्याआधी नाभीत दोन ते तीन तेलाचे थेंब घातल्यामुळे शरीरातील वात, कफ, पित्त दोष सुधारतो.
नाभीत तेल घातल्यामुळे आपल्या ओठाचं सौंदर्य अबाधित राहतं. यामुळे आपले ओठ फुटत नाहीत.
उत्तम झोपेसाठी सुद्धा नाभीत तेल घालणं हे खूप गरजेचं आहे.
आर्युवेदानुसार नाभीत तेल घातल्यामुळे, चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते.
नाभीत तेल टाकल्यामुळे पोटफुगी, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्याही दूर होतात.
मन आणि डोकं शांत राहण्यासाठी नाभीत तेल घालणं हा रामबाण उपाय मानला जातो.
डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सुद्धा नाभीत तेल घालणं हे उपयुक्त मानलं जातं.
सांधेदुखीसाठी सुद्धा नाभीमध्ये तेल घालणं हा उत्तम उपाय मानला गेला आहे.
महिला आणि पुरुषांमध्ये प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा नाभीत तेल घालणे हा उपाय पूर्वापार चालत आला आहे.
नाभीत कोणते तेल घालावे?
खोबरेल तेल, लिंबाचे तेल, बदाम तेल किंवा मोहरीचे तेल आपण नाभीमध्ये घालू शकतो.
(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)