![neehar - 2025-02-12T163154.093](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-2025-02-12T163154.093-696x447.jpg)
आयुर्वेदात अनेक गुणकारी औषधं आहेत. आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाच्याच जोरावर स्वतःचे आरोग्य उत्तम टिकवले होते. घरच्या घरी उपलब्ध असलेले अनेक पदार्थ खूप बहुमोली असतात. याचाच प्रत्यय आपल्याला आपल्या मसाला डबा पाहिल्यावर येईल. जायफळ हा मसाला वर्गातील असला तरी त्याचे फायदे खूप आहेत. आपल्या किचनमध्ये काही पदार्थ हे फार सहजसुलभ उपलब्ध असतात. मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे अनेक पदार्थ घरगुती उपचारासाठी वापरण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. दाढ दुखतेय दाढेत लवंग ठेवा हे आपण वरचेवर ऐकतोच.
असाच एक मसाल्याच्या डब्यातील पदार्थ म्हणजे जायफळ. मिरिस्टिका वृक्षाच्या बीला जायफळ असे म्हणतात. जायफळाचा वापर गोड पदार्थांची लज्जत वाढवायची असेल तर केला जातो. गोड पदार्थांना जायफळ शिवाय पर्याय नाही. जायफळाचे तेल आयुर्वेदात वापरले जाते.
त्वचेसाठी जायफळ हा पर्याय सर्वात बेस्ट मानला जातो. फायबर आणि थियामिनचा जायफळमध्ये समावेश असतो. त्यामुळेच जायफळचा उपयोग हा त्वचेसाठी करता येतो. तसेच व्हिटॅमीन बी 6, फॉलेट, कॉपर, मॅक्लिग्रॅन, मॅग्नेसिअम सारखे पोषक तत्व असतात. म्हणूनच जायफळ हे खूपच उपयुक्त आहे. केवळ इतकेच नाही तर, जायफळाचे तेल औषधांमध्ये सुद्धा वापरले जाते. स्त्रियांसाठी असणारे कॉस्मेटिक मध्ये जायफळ तेल वापरलं जातं. हे तेल आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे, या तेलामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होतो. म्हणूनच खास टुथपेस्टमध्ये जायफळ तेलाचा वापर हा हमखास केला जातो. जायफळ मध्ये असलेले ऍन्टीइमफ्लामेंन्ट्री गुण खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच या तेलाचा उपयोग पाण्यात काही थेंब टाकून गुळण्या करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हिरड्यांची सूज कमी होते त्याचबरोबर दातदुखीवर हे तेल रामबाण उपाय आहे.