काश्याची वाटी आहे लहान, पण याचे फायदे आहेत आरोग्यासाठी महान…

दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. मग ही शारिरीक मरगळ  कमी करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज पार्लरची खर्चिक अपॉईन्टमेंट घेतली जाते. अशा वेळखाऊ आणि खर्चिक अपॉइंटमेंट घेण्याआधी आयुर्वेदाने दिलेल्या पादाभ्यंगया सहज सोप्या आणि घरच्या घरीही करणं शक्य असलेल्या तितक्याच प्रभावी उपचारपद्धतीबाबत नक्की जाणून घ्या.

पूर्वीच्या काळी लग्नाच्या आहेरात हमखास दिल्या जाणार्‍या काश्याच्या वाटीमागे आरोग्यदायी संकेत दडला आहे. पादाभ्यांग/पायाला मसाज करताना  काश्याच्या वाटीचा कशाप्रकारे वापर करावा. कांस्य थाळी फूट मसाज म्हणजे काशाच्या वाटीने पायाला मसाज करणे. आयुर्वेदात याला “पादाभ्यंग” म्हणतात. कांस्य हा मिश्र धातू आहे जो तांबे आणि जस्त यांचे बनलेला असतो. कांस्याला थंड गुणधर्म आहेत आणि त्यामुळे ते शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

कांस्य हा मिश्र धातू असून, यामध्ये तांबे आणि जस्त मिश्रित असते. म्हणूनच या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेला कांस्य या धातूपासून काश्याची वाटी बनवली जाते. शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी काश्याची वाटी प्रभावी ठरते. पायाला तेलतूप लावून मसाज करण्याच्या प्रक्रियेला/उपचार पद्धतीला पादाभ्यंग म्हणतात. आबालवृद्धांनी नियमित पायाला मसाज करणे आवश्यक आहे. कारण आयुर्वेदानुसार डोकंकान आणि पाय या तीन अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते. वेळीच त्याचा निचरा न झाल्यास शरीरात काही दोषआजार वाढण्याची शक्यता बळावते. 

ताक प्या गारेगार राहा… उन्हाळ्यात ताक पिण्याचे मिळतील अगणित फायदे.. 

कांस्य थाळी फूट मसाजचे फायदे खूप सारे आहेत. कांस्य थाळी नसेल तर, तुम्ही कांस्य वाटीनेही मसाज करु शकता. शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी काशाची वाटी हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. केवळ इतकेच नाही तर, काश्याच्या वाटीने मसाज केल्यामुळे, वात कमी होण्यास मदत होते. तसेच शरीराला सतत जाणवणारा थकवाही कमी होतो. डोकेदुखी कमी करण्यासाठी फार पूर्वीपासूनच काश्याची वाटी रामबाण इलाज म्हणून वापरली  जात असे. काश्याच्या वाटीने मसाज केल्यामुळे, झोप चांगली लागते, शिवाय पायांच्या स्नायूंना खूप मस्त आराम मिळतो. काश्याच्या वाटीने मसाज केल्यामुळे पायांमधील रक्तप्रवाह सुधारतो. काश्याच्या वाटीने पायाला मसाज केल्याने वात कमी होण्यासोबतच पायाच्या तळव्याला भेगा पडणे, पायात आग / जळजळ जाणवणे अशा समस्या कमी होतात. शरीरात थंडावा वाढतो. डोळ्यांचे आरोग्य पायांवर अवलंबून असल्याने डोळ्यांच्या स्नायूंना तेथील नसांना चालना मिळण्यासाठी पायाला मसाज करणं फायदेशीर ठरते. त्वचेतील शुष्कता कमी होऊन मुलायमपणा वाढतो. पायांना मसाज केल्याने झोपेची समस्या सुटते. 

(कोणताही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

हिरवळीवर चाला आणि निरोगी राहा! वाचा हिरवळीवर चालण्याचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे