
ज्वारीला आपल्या आहारामध्ये हे खूप महत्त्वाचं स्थान आहे. ज्वारीत असलेल्या कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि प्रथिने यांसारख्या घटकांमुळे वजन कमी करण्यासाठी ज्वारी फार महत्त्वाची मानली जाते. आपल्यापैकी अनेक घरांमध्ये गव्हाच्या पिठाच्या पोळ्या बनवल्या जातात. ज्वारीच्या भाकरीचा आहारातील समावेश हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पचनसंस्था मजबूत होतेच, शिवाय अनेक आजारांपासूनही आराम मिळतो.
ज्वारीमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते, त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळता येतात.
ज्वारीची भाकरी खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही. यामध्ये असलेले फायबर पोट भरलेले ठेवते, ज्यामुळे वजन नियंत्रित करणे सोपे होते.
ज्वारीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदय निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो.
ज्वारीची भाकरी खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात. ज्वारीमध्ये असलेले प्रथिने स्नायू आणि हाडे मजबूत करतात.
ज्वारी ग्लूटेन मुक्त आहे. जे लोक ग्लूटेन मुक्त अन्न खातात त्यांच्यासाठी ज्वारी हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे.
ज्वारीची भाकरी पचायला हलकी असल्यामुळे, त्यामुळेच ही भाकरी खाणे हे कोणत्याही ऋतूमध्ये हितावह आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्वारीच्या भाकरीचा खूप मोठा मोलाचा वाटा मानला जातो.
ज्वारीची भाकरी खाण्यामुळे शरीरातील कोलेस्ट्राॅल कमी होते, त्यामुळे हृद्यही निरोगी राहते.
ज्वारीमध्ये बी- १, बी- २, बी- ३ फायबर आणि प्रथिने मुबलक असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी खाल्ल्यामुळे शरीराला उर्जा मिळते.
ज्वारीच्या भाकरीमध्ये लोहाचे प्रमाण मुबलक असते. तसेच कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हाडांची मजबूती वाढते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )