
जगात दोन प्रकारची माणसे आहेत, एक ज्यांना फणस अजिबात आवडत नाही आणि दुसरे ज्यांना फणस खूप आवडतो. तुम्हाला फणस आवडतो की नाही, हा एक वेगळाच विषय आहे. फणसाचा सीझन आल्यावर अनेकजण फणस खाण्याकडे वळतात. कच्च्या फणसाची भाजीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.
फणस खाण्याचे फायदे
फणसाच्या पानांची राख अल्सरच्या उपचारासाठी खूप उपयुक्त आहे. त्याची ताजी हिरवी पाने स्वच्छ धुवून वाळवा आणि त्याची पावडर तयार करा. या पावडरचे सेवन केल्याने पोटाच्या अल्सरमध्ये खूप आराम मिळतो.
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी फणसाच्या बियांची पावडर बनवून त्यात थोडे मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने, चेहऱ्यावरील डाग दूर होतात. ज्यांचा चेहरा कोरडा आणि निर्जीव आहे, अशांनी फणसाचा रस चेहऱ्यावर लावावा. मसाज करावा त्यानंतर काही वेळाने चेहरा पाण्याने धुवा.
सुरकुत्या दूर करण्यासाठी फणसाची पेस्ट बनवून त्यात एक चमचा दूध मिसळून चेहऱ्याला हळूहळू लावावे. त्यानंतर गुलाबपाणी किंवा थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. असे नियमित केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.
तोंडात फोड आल्यास फणसाची कच्ची पाने चावून थुंकावीत. याने व्रण बरे होतात. पिकलेल्या फणसाच्या लगद्याला चांगले मॅश करून पाण्यात उकळवा. हे मिश्रण थंड करून एक ग्लास प्यायल्याने प्रचंड ऊर्जा मिळते. अपचनाचा त्रास असलेल्या रुग्णाला हे मिश्रण दिल्यास त्याचा फायदा होतो.
फणसाच्या पानांच्या रसाचे सेवन मधुमेहामध्ये खूप फायदेशीर आहे. हा रस उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी चांगला आहे. अस्थमाच्या रुग्णांसाठी फणासाच्या झाडाचे मूळ फायदेशीर मानले जाते. ते पाण्यात उकळून, उरलेले पाणी गाळून प्यायल्यास दमा आटोक्यात येतो.
थायरॉईडसाठीही फणस खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले सूक्ष्म खनिजे आणि तांबे थायरॉईड चयापचयसाठी प्रभावी आहेत. हे अगदी जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)