Ice Facial: त्वचा डिटॉक्स करण्यासाठीचा परफेक्ट उपाय… जाणून घ्या अन्य फायदे

मध्यंतरी बाॅलिवूडच्या अनेक तारकांचे आईस फेशियलचे ( Ice Facial ) व्हिडीओ हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यामध्ये आलिया भट, कतरिना कैफ, दीपिका पादुकोण यांचा समावेश होता. आईस फेशियल हा या अभिनेत्रींच्या रुटीनचा भाग असल्याचं यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मात्र जनसामान्यांमध्येही हे फेशियल करण्याची क्रेझ निर्माण झाली. आईस फेशियल केल्याने चेहऱ्याच्या त्वचेसाठी अनेक फायदे होतात, तेच फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

त्वचा डिटॉक्स

 

जसे शरीर आतून डिटॉक्स करता येते तेसेच त्वचा ही डिटॉक्स करता येते. Ice Facial ने त्वचा डिटॉक्स होते. तसेच आइस फेशियलमुळे चेहऱ्यावरील सूजही फार मोठ्या प्रमाणात कमी होते. या फेशियलमुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स नाहीसे होण्यास मदत होते.

चमकदार त्वचा

आईस फेशियलमुळे चेहऱ्यावर चमक येते. शिवाय या फेशियमुळे त्वचेमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचे प्रमाण वाढते.
आइस फेशियल त्वचेचे वृद्धत्व कमी करते. आईस फेशियल त्वचेवरील अतिरिक्त तेलही काढून टाकते. चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा सर्वात तात्काळ परिणाम म्हणजे तो त्वरित चमक देतो. थंड तापमान रक्ताभिसरण वाढवते, त्वचेच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवते. या वाढीव रक्त प्रवाहामुळे तुमचा चेहरा तेजस्वी चमक देतो, ज्यामुळे तो अधिक ताजा आणि निरोगी दिसतो.

हे विशेषतः कंटाळवाणी, थकलेली त्वचा असलेल्या व्यक्तींसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा फोटोशूटसाठी तयारी करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. तुम्ही लग्न, पार्टी किंवा एखाद्या खास प्रसंगासाठी तयार होत असाल तर, ही आईस फेशियल थेरपी तुमच्यासाठी नक्कीच वरदान ठरेल यात शंकाच नाही.

आईस फेशियल कसे करावे:

  1. एका मोठ्या भांड्यात पाण्यात बर्फ काढून घ्या आणि त्यात तुमचा चेहरा बुडवा.

  2. 20-30 सेकंदांनी तुमचा चेहरा बाहेर काढा.

  3. जर तुम्हाला तुमचा चेहरा पाण्यात बुडवायचा नसेल, तर 2-3 बर्फाचे तुकडे सुती कापडात गुंडाळा आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावा.

(वैद्यकीय सल्ला: कोणतेही प्रयोग करण्यापूर्वी ते आपल्या फॅमेली डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञांना विचारून करणे आवश्यक आहे.)