Hibiscus Flower- जास्वंदीचे फूल फक्त केसांसाठी नाही तर, चेहऱ्यावर चमक आणण्यासाठीही उपयुक्त!

असं म्हणतात की, निसर्ग आपल्यावर कायमच मुक्तहस्ताने उधळण करत असतो. निसर्गातील सर्व घटक हे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वरदान मानल्या जातात. आता हेच बघा, जास्वंदीचे साधे सुंदर फूल आपल्याला कितीप्रकारे वरदान ठरलेले आहे. जास्वंद केवळ केसांसाठी उपयुक्त नाही तर, जास्वंदीच्या वापराने आपण चेहऱ्यावरही चमक आणू शकतो. जास्वंदीचे फूल हे सहज उपलब्ध असल्यामुळे, आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिकरीत्या चमक आणण्यासाठी खूप उपयुक्त आहे. मुख्य म्हणजे जास्वंदीचे फूल फार महाग नसल्यामुळे, खिशालाही चटक न बसता चेहरा चमकणार आहे.

जास्वंद केवळ केस आणि चेहरा यासाठी नाही तर, पोटात औषध म्हणून घेण्यासाठीही जास्वंदीचा वापर केला जातो. म्हणूनच हे स्वस्त आणि मस्त फूल बहुपयोगी आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

 

जास्वंदीच्या फुलाचे चेहऱ्यासाठी फायदे

जास्वंदीच्या फुलामध्ये आढळणारी प्रथिने हे चेहऱ्यावरील त्वचेसाठी फार उपयुक्त मानली जातात. प्रथिनांच्या मुबलक साठ्यामुळे चेहरा तजेलदार दिसण्यास मदत होते.

 

जास्वंदीच्या फुलात असलेल्या गुणधर्मामुळे त्वचा तरुण आणि तेजस्वी राहण्यास मदत होते.

 

त्वचेसाठी गरजेचे असणारे व्हिटॅमिन सी हे जास्वंदीच्या फुलामध्ये मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे त्वचेला योग्य ते पोषण मिळण्यास मदत होते.

जास्वंदीच्या फुलात अॅंटी आॅक्सिडंटचा भरपूर साठा असल्यामुळे, आपल्या चेहऱ्याचे बॅक्टेरियापासून संरक्षण होते.

 

जास्वंदीचे फूल चेहऱ्याला लावल्यास, चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होते. परंतु केवळ एक दिवस हे फूल चेहऱ्याला लावणे उपयोगाचे नाही तर, याकरता नियमितपणा असायला हवा.

 

जास्वंदीच्या फुलामुळे उन्हामध्ये टॅनिंग झालेल्या चेहऱ्यावर उजळपणा आणण्यास मदत करते.

Hibiscus Flower Face Pack- जास्वंदीच्या फुलाचे फेस पॅक त्वचेला देतील नैसर्गिक ग्लो, साध्या सोप्या घरगुती उपायांनी त्वचेला मिळतील खूप फायदे

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)