
उन्हाळा सुरु होताच शरीरातून घामाच्या धारा वाहू लागायला सुरुवात होते. अशावेळी घरातील मोठी माणसे कायम गुलकंद खायचा सल्ला देतात. कुलकंद हा गर्मीच्या दिवसातला थंड उतारा मानला जातो. गुलकंद हा खासकरून उन्हाळ्यात किमान एक चमचा खाणे खूप गरजेचे आहे.
गुलकंद हा कोणत्याही गुलाबापासून बनत नसून, केवळ देशी गुलाबापासूनच गुलकंद तयार करण्यात येतो. गुलकंद तयार करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर या दोन गोष्टी प्रामुख्याने वापरल्या जातात. उन्हाळ्यातील अनेक त्रासांवर गुलकंद हा रामबाण इलाज आहे. चला तर पाहुया, गुलकंद खाण्याचे आरोग्यासाठी काय फायदे होतात.
उन्हाळ्यात पित्ताचा त्रास उफाळून येताे अशावेळी किमान एक चमचा गुलकंद खाणे हे खूप फायदेशीर ठरते. पोटातील जळजळ अपचन यासारख्या त्रासांवर गुलकंद खाण्याचा सल्ला दिला जातो.
लघवीला जळजळ होण्याचे प्रमाण उन्हाळ्यात वाढते. याचबरोबर तोंडात फोड येण्याचेही प्रमाण खूप वाढते. अशावेळी गुलकंद खाण्यामुळे हे त्रास कमी होऊ शकतात.
गुलकंद आतड्यांच्या आरोग्यासाठी आवर्जून खायला हवा. ज्यांना बद्धकोष्टतेचा त्रास वारंवार होतो त्यांना डाॅक्टर किमान चमचाभर गुलकंद खाण्यास सांगतात.
गुलकंदामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. मॅग्नेशियम हे रक्तदाब आणि साखरेची पातळी उत्तम राखण्यासाठी मदत करतात त्यामुळे हृद्य निरोगी राहण्यास खूप मदत होते. म्हणूनच निरोगी हृद्यासाठी गुलकंद खाणे हे खूप गरजेचे आहे.
रक्तशुद्धीसाठी गुलकंद हा एक खात्रीशीर उपाय मानला जातो. गुलकंदाच्या सेवनामुळे रक्तशुद्धी होते त्याजोडीला त्वचेला उजाळा देखील मिळतो.
चेहऱ्यावरील मुरुम, पिंपल्स तसेच काळे डाग गुलकंदाच्या सेवनाने कमी होतात. त्याचबरोबर ब्लॅकहेडस्ची समस्याही खूप मोठ्या प्रमाणात कमी होते.
शाळेत जाणाऱ्या मुलांना नियमितपणे गुलकंद दिल्यास, त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास खूप मदत होते. म्हणूनच अनेक पालक मुलांसाठी खास गुलकंद घरी बनवणे पसंत करतात.
(कोणताही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)