
सणासमारंभाला जाण्याआधी बहुतांशी महिला या पार्लरमध्ये जाऊन ब्लिचिंग आणि त्यानंतर फेशियल करुन घेतात. खरंतर ब्लिचिंग हे फार करण्याची गरज नसते. ब्लिचिंगमुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते. परंतु चेहऱ्यावर अधिक केस असल्यामुळे, काही महिलांना ब्लिचिंग करणे हे खूपच गरजेचे असते. फेशियल ब्लिचमुळे चेहऱ्यावरील केसांचा रंग हलका होण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा उजळ दिसण्यास मदत होते. काळ्या रंगाचे केस त्यामुळे सोनेरी रंगाचे होतात, त्यामुळे चेहरा अधिक चमकू लागतो. चेहऱ्यावर पिगमेंटशनचे डाग हे मोठ्या प्रमाणात असल्यावर, ब्लिचिंग हा एक उत्तम पर्याय मानला जातो.
तुम्हाला ब्लिचिंगचे हे फायदे माहित आहेत का?
ब्लिचिंग केल्यामुळे त्वचेवर झालेले टॅनिंगचे डाग फार मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होते. तसेच स्किन व्यवस्थित टोन्ड होण्यासही मदत होते.
ब्लिचिंगमुळे त्वचेला एक अनोखी चमक येते, म्हणूनच खास समारंभासाठी फेशियलसोबत ब्लिचिंग करणे गरजेचे आहे.
मुरुमांमुळे चेहऱ्यावर पडलेले व्रण कमी होण्यास मदत होते. सोरायसिस सारख्या त्वचारोगामुळे झालेले डागही ब्लिचिंगमुळे कमी होण्यास मदत होते.
ब्लिचिंगसाठी कुठलेही अधिक कष्ट घेण्याची गरज नसते. केवळ चेहऱ्यावर क्रिम लावून काही मिनिटे ठेवून द्यावी लागेल. त्यानंतर फक्त काही मिनिटांमध्येच चमकदार चेहरा मिळू शकतो.
चेहऱ्याला थ्रेडिंग वॅक्सिंग करताना दुखापत होण्याचा संभव असतो. तो ब्लिचिंग करताना अजिबात होत नाही. त्यामुळेच चेहऱ्यावरील लव कमी वेळात लपवण्यासाठी आणि चेहऱ्याला चमक येण्यासाठी ब्लिचिंग हा उत्कृष्ट पर्याय मानला जातो.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)