
पान खाए सैय्या हमारे.. हे गाणं ऐकताच आपल्या डोळ्यासमोर विड्याचं पान येतं. विड्याचं पान हे केवळ खाण्यासाठी नाहीतर याचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत. म्हणून विड्याच्या पानाचा उपयोग आपल्याकडे देवपूजेपासून ते इतर अनेक औषधोपचार करण्यासाठी केला जातो. विड्याचे पान हे मधुमेहींसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते.
मधुमेह नियंत्रित करते –
मेथीच्या बियांमध्ये असलेले ग्लुकोसामाइन फायबर रक्तातील साखर नियंत्रित करते आणि विड्याची पाने इन्सुलिन संवेदनशीलता वाढविण्यास मदत करतात. हे मिश्रण टाइप-2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
हार्मोन्स संतुलित करते –
मेथी महिलांमधील हार्मोन्सला संतुलित करण्यास मदत करते. विड्याची पाने गर्भाशय स्वच्छ ठेवण्यास आणि मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. यामुळे पीसीओडी आणि अनियमित मासिक पाळीच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
पचन सुधारते –
विड्याच्या पानांमध्ये सूक्ष्मजीवविरोधी आणि पाचक गुणधर्म असतात, तर मेथीमध्ये फायबर आणि आम्लविरोधी गुणधर्म भरपूर असतात. हे दोन्ही मिळून गॅस, अॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्या दूर करतात.
सांधेदुखीपासून आराम –
मेथीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि विड्याची पाने रक्ताभिसरण सुधारतात. यामुळे सांधे सूज, वेदना आणि संधिवात सारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
तोंडाची दुर्गंधी कमी करते –
विड्याच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे तोंडातील जंतू नष्ट करतात. मेथी तोंडाच्या सूज आणि अल्सरपासून आराम देते.
मेथी आणि विड्याच्या पानांचे सेवन कसे करावे? – सकाळी रिकाम्या पोटी विड्यांच्या पानांचे आणि मेथीचे सेवन करणे आरोग्यदायी ठरते. यासाठी, रात्रभर 1 चमचे मेथीचे दाणे भिजवून घ्या. सकाळी, एक ताजे विड्याचं पान घ्या आणि त्यात हे मेथीचे दाणे घाला. यानंतर ते चावून खा नंतर कोमट पाणी प्या.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)