
एका काळ होता त्यावेळी सुर्यास्तानंतर अन्नप्राशन करणे हे वर्ज्य समजलं जायचं. आज मात्र आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि वेळा दोन्ही बदलल्या आहेत. खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीरावर अतिशय विपरीत परीणाम होतात. आपल्याकडे म्हणूनच जेवणानंतर किमान काही काळ झोपू नये असे म्हटले जाते. म्हणूनच पूर्वीची जुनी-जाणती माणसं कायम म्हणायची, की शतपावली करा. काय असेल बरं या सर्वांमागचं कारण… जेवणानंतर शतपावली करण्याची प्रथा आता बंद पडल्यातच जमा आहे. अलीकडे आपल्या घरी जाण्या-येण्याच्या वेळाच बदलल्या आणि तिथेचे आपल्या सवयीही बदलल्या. म्हणूनच शतपावली म्हणजे काय असा अनेकांना प्रश्न पडतो. शतपावली म्हणजे जेवणानंतर काही काळ चालणे. त्यालाच शतपावली असे म्हणतात. म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर किमान शतपावली म्हणजे शंभर पावले चालणे हे खूपच गरजेचे आहे.
काय होतात शतपावली करण्याचे फायदे
रात्री जेवण करुन झाल्यानंतर चालणे हे खूप गरजेचे आहे. यामुळे जेवणामध्ये आणि आपल्या झोपेच्या वेळेमध्ये अंतर राहते. यामुळेच आपली पचनशक्ती सुधारण्यास खूप मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्यामुळे आपली पाचन प्रणाली निरोगी राहते. पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्येपासून आराम मिळतो.
आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी, रात्री जेवणानंतर चालणे हे खूप गरजेचे आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे, आपले शरीर गंभीर आजारांपासून आपले संरक्षण करण्यास सक्षम होते.
Weight Loss- वजन कमी करण्यासाठी आणि डायबेटीजसाठी रामबाण उपाय आहे ही औषधी वनस्पती!!!
मधुमेह असणाऱ्यांसाठी रात्री जेवणानंतर शतपावली करणे हे खूपच गरजेचे आहे. रात्री जेवून झाल्यानंतर, शतपावली केल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हे मधुमेहग्रस्तांसाठी अतिशय फायदेशीर ठरते.
आपल्याला वजन कमी करायचे असेल तर, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे हे खूपच गरजेचे आहे. शतपावली करण्यामुळे आपला मेटाबॉलिज्म तर वाढतोच. शिवाय मोठ्या प्रमाणात आपल्या कॅलरीजही बर्न होतात. अधिक कॅलरी बर्न झाल्यामुळे, आपले वजनही लवकर कमी होण्यास सुरुवात होते.
आपल्याला शरीराचे चयापचय वाढवायचे असेल तर, जेवणानंतर शतपावली करणे हे खूप गरजेचेआहे. शतपावली करण्यामुळे आपल्या शरीरातील एंडोर्फिन बाहेर पडून तणाव कमी होतो. त्यामुळे आपला मूडही सुधारण्यास खूप मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्यामुळे आपला ताणही कमी होतो आणि मनावरील भारही हलका होतो.