Hair Care- कढीपत्ता आहे केसांसाठी वरदान; केस काळेभोर, लांबसडक होतील! वाचा सविस्तर

कढीपत्ता आणि फोडणी हे न तुटणारं समीकरण आहे. पण असं असलं तरी, कढीपत्ता आणि केस याचंही जवळचं नातं आहे. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता हा खूप गरजेचा आहे. कढीपत्त्यामध्ये अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारखे समृद्ध पोषक घटक असतात जे केसांसाठी खूप गरजेचे असतात. केस तुटणे आणि गळण्यावरही कढीपत्ता खूप उपयोगी मानला जातो.

कढीपत्ता केसांसाठी का आहे महत्त्वाचा

काळ्या केसांसाठी आपण कढीपत्ता सेवन करु शकतो. याकरता किमान 5  ते 7 कढीपत्त्याची पाने रोज धुवून खायला हवीत. रिकाम्या पोटी कढीपत्ता खाणे हे खूपच फायद्याचे आहे. यामुळे शरीरात व्हिटॅमिन बी आणि सी वाढीसाठी चालना मिळते. तसेच कढीपत्त्यामध्ये असलेले घटक कोलेजन वाढवण्यासही मदत करतात.

 

कढीपत्ता आणि कापूर दोन्हीही कोंड्याच्या समस्येवर घरगुती रामबाण उपाय आहे. तुम्हाला कोंड्यामुळे खाज येत असेल तर, कढीपत्ता आणि कापूर बारीक करून पेस्ट तयार करावी. नंतर ही पेस्ट केसांच्या मुळाशी चांगली चोळून लावावी. किमान 1 तास हा पॅक तसाच राहू द्यावा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवावेत.

केस गळती रोखण्यासाठी कढीपत्त्यापासून तेल बनवून वापरू शकतो. यासाठी मोहरीच्या तेलात कढीपत्ता शिजवा आणि केसांना लावा. थोडा वेळ मालिश करा. हे तुमच्या केसांच्या मुळांना पोषण देईल आणि केसांची वाढ जलद होण्यास मदत करेल. याशिवाय, त्यातील अँटीऑक्सिडंट्स तुमचे केस जलद वाढण्यास मदत करतील.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)