मॅट लिपस्टिक लावण्याचे ‘हे’ आहेत खूप सारे फायदे

सध्याच्या घडीला मॅट लिपस्टिकची चलती ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. मॅट लिपस्टिकला सर्व वयोगटातील महिलांची पसंती ही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. मॅट लिपस्टिक ही एखाद्या लग्नसोहळ्यापासून ते अगदी कार्यालयात जाताना लावण्यासाठी एक उत्तम पर्याय मानला जात आहे.
वापरण्यास सुलभ असल्यामुळे मॅट लिपस्टिकला सर्वाधिक पसंती मिळत आहे.
आता आपण बघूया मॅट लिपस्टिक लावण्याचे काय आहेत फायदे.
मॅट लिपस्टिक ही दीर्घकाळ टिकत असल्यामुळे, वारंवार टचअप करण्याची गरज राहात नाही हा या लिपस्टिकचा मुख्य गुणधर्म मानला जातो.
इतर लिपस्टिक लावल्यानंतर पसरण्याची भीती असते, हे मात्र मॅट लिपस्टिकच्या बाबतीत होत नाही. मॅट लिपस्टिक ही पसरत तर नाहीच. शिवाय ही वाॅटरप्रुफ असल्यामुळे, घाम आल्यावरही ही लिपस्टिक सहसा जात नाही.
मॅट लिपस्टिकमुळे आपल्या ओठांनाही ट्रेंडी आणि उठावदार असा मस्त लूक मिळतो.
मॅट लिपस्टिक कशी लावावी?
मॅट लिपस्टिक लावताना ओठांना सर्वात आधी लिप पेन्सिलने साईड बाॅर्डर काढून घ्यावी.
ही बाॅर्डर काढून झाल्यानंतर, त्यामध्ये बाॅर्डरच्या बाहेर न जाता आतमधल्या भागात मॅट लिपस्टिक लावावी.
ओठांच्या बाहेर चुकून ही लिपस्टिक लागल्यास, टिशू ओला करून अलगदपणे ही लिपस्टिक पुसावी.