पेरुच्या पानांचा चहा या समस्यांवर आहे रामबाण उपाय, जाणून घ्या सविस्तर

पेरु हे फळ अनेकांना आवडते या पेरुबरोबर पेरुच्या पानांना ही अनन्यासाधारण महत्व आहे. तुम्हाला माहित आहे का पेरुच्या पानांच्या चहाचे चमत्कारीक फायदे. सकाळी अनाशी पोटी पेरुच्या पानांचा चहा प्यायल्याने शरीराला प्रचंड फायदा होतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि आर्यन असते. यामध्ये अॅण्टीऑक्सिडेण्ट, अॅण्टी इंफ्लेमेटरी आणि अॅण्टी बॅक्टेरिअल सारखे गुणधर्म आढळतात. जाणून घेऊया पेरूच्या पानांची चहा कशी बनवायची आणि ती कोणी प्यावी.

कसा बनवावा चहा

पेरुच्या पानांचा चहा बनविण्यासाठी त्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यानंतर एका पातेल्यात एक ग्लास पाणी घ्यावे आणि धुतलेली पाने त्यात टाकून चांगले उकळून घ्यावे. त्यानंतर एका कपमध्ये ते पाणी गाळून घ्यावे. ते पाणी असेही पिऊ शकता किंवा त्यात लिंबू आणि मध मिक्स करुनही ते घेऊ शकता.

ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी पेरुचा चहा अत्यंत फायदेशीर होऊ शकतो. यामध्ये अॅण्टी इन्फ्लामेण्टरी आणि अॅण्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात जे पचनक्रिया चांगली ठेवून कफापासून दूर ठेवण्यात मदत करते.

 पेरुचा चहा रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी उत्तम स्त्रोत मानला जातो. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत राखण्यासाठी पेरुच्या पानांचा चहा उत्तम मानला जातो.

अलिकडे सर्वांनाच केसांच्या समस्या जाणवतात. केसांच्या समस्या दूर करायच्या असतील त्यांच्यासाठीही पेरुच्या पानांचा चहा गुणकारी मानला जातो. कारण त्यात अॅण्टीऑक्सिडेण्ट गुणधर्म असतात. जे केसांची वाढ आणि केसांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

पेरूच्या पानांपासून बनवलेला चहा दररोज प्यायल्याने ताण कमी होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करायचे असेल तर दररोज पेरूच्या पानांपासून बनवलेला चहा प्या. त्यात असे अनेक गुणधर्म आढळतात, जे चरबी कमी करण्यास मदत करतात.