फायदा अदानी, अंबानींना खुर्ची वाचवा बजेट; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

केंद्रीय बजेट हे ‘खुर्ची वाचवा बजेट’ असून भाजपच्या मित्रपक्षांना खूश करणारे असल्याची प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. बजेटचा फायदा अदानी आणि अंबानींना होणार असून सर्वसामान्यांना काहीही मिळणार नाही. एनडीएचे बजेट म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागील बजेटची नक्कल असल्याचे ते म्हणाले.