
पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा करून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) हा बेल्जियमध्येच असल्याचे बेल्जियमच्या पररराष्ट्र मंत्रालयाने कबूल केले आहे. तसेच हिंदुस्थानचे परराष्ट्र अधिकारी मेहूल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी आमच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मेहूल चोक्सी हा गेली अनेक वर्ष अँटिग्वामध्ये राहत होता. आता काही दिवसांपूर्वी तो तिथून पसार झाला असून त्याने बेल्जियममध्ये आश्रय घेतला आहे. मेहूल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी ही बेल्जियमची नागरिक आहे. तिच्यासोबत बेल्जियममधील अँटवर्प येथे एफ रेसिडेन्सी कार्ड मिळवून राहत आहे. रेसिडेन्सी कार्ड मिळवण्यासाठी त्याने बेल्जियमच्या प्रशासनाला बनावट कागदपत्रे सादर केल्याची माहिती समोर येत आहे. तो आजारपणासाठी अँटिग्वा सोडून गेल्याची माहिती देण्यात आली होती.
मेहूल चोकसी हा 13 हजार 500 कोटी रुपयांच्यां PNB घोटाळ्यातील आरोपी आहे. मेहूल चोकसीचा भाचा नीरव मोदी हा देखील या प्रकरणातील सह आरोपी आहे. नीरव मोदी हा लंडनमध्ये असून त्याच्याही प्रत्यार्पणाची प्रक्रीया सुरू झाली आहे.