OnePlus 13 लॉन्च होण्याआधी ‘हे’ 3 स्मार्टफोन झाले स्वस्त, मिळत आहेत जबरदस्त डिस्काउंट

OnePlus 13 लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनी याच्या लॉन्चची तारीखही निश्चित केली आहे. कंपनी 7 जानेवारी 2025 रोजी जागतिक बाजारपेठेत आणि हिंदुस्थानात हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. याआधीही कंपनी सध्याच्या मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. जसजसा इव्हेंट जवळ येत आहे, वनप्लस 12 ची किंमत बरीच कमी झाली आहे. कंपनीचा लास्ट जनरेशन फ्लॅगशिप फोन Amazon वर मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त आणखी दोन स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे. कोणते आहे हे फोन आणि काय आहे ऑफर, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

OnePlus 12 डिस्काउंट ऑफर

OnePlus 12 Amazon वर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 59,999 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत लिस्ट करण्यात आला आहे. ही फोनच्या लॉन्चिंग किंमत 64,999 रुपयांपेक्षा कमी आहे. 16GB RAM आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 64,999 रुपये आहे, जी 69,999 रुपयांच्या लॉन्च किंमतीपेक्षा कमी आहे. म्हणजेच हे दोन्ही फोन 5,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट ऑफरसह उपलब्ध आहे.

तसेच जर तुमच्याकडे ICICI बँक क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्ही चेकआउटच्या वेळी अतिरिक्त 7,000 रुपयांची फ्लॅट बँक डिस्काउंट मिळवू शकता. यासह OnePlus 12 च्या 12GB RAM व्हेरिएंटची किंमत फक्त 52,999 रुपये आणि 16GB RAM व्हेरिएंटची किंमत 57,999 रुपये होईल. जर तुमच्याकडे ICICI बँक क्रेडिट कार्ड नसेल आणि तरीही तुम्हाला ही डील मिळवायची असेल, तर तुमच्याकडे OneCard क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. OneCard वर 7,000 रुपयांची हीच बँक डिस्काउंट ऑफर देखील उपलब्ध आहे.

OnePlus 12R आणि OnePlus Nord 4 5G वर डिस्काउंट

Amazon OnePlus 12R आणि OnePlus Nord 4 5G वर देखील डिस्काउंट मिळत आहे. जर आपण OnePlus 12R बद्दल बोललो तर, हा फोन सध्या फक्त 38,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर कंपनीने तो 45,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. तसेच OnePlus Nord 4 5G जो 29,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता, जो आता Amazon वर 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही फोनवर 2000 रुपये बँक डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.